१. मला दिवसभर किती वेळ ग्रास कटर वापरायला लागणार आहे ?
4 स्ट्रोक इंजिन हे 2 स्ट्रोक च्या तुलनेत वजनाने थोडे जड असतात. तसेच 2 स्ट्रोक चे RPM हे 4 स्ट्रोक पेक्षा जास्त असते, म्हणजेच 2 स्ट्रोक ने काम 4 स्ट्रोक पेक्षा जलद होऊ शकते. त्यामुळे पूर्ण दिवस जर तुमचे काम असणार असेल तर 2 स्ट्रोक हे पर्यायाने तुमच्यासाठी चांगले ठरू शकेल. त्याचसोबत हे देखील लक्षात घेतले पाहिजे की 4 स्ट्रोक इंजिन चे स्टार्टर रोप ओढणे हे 2 स्ट्रोक पेक्षा सहज ओढता येते. त्यामुळे तुमच्या कामामध्ये जर तुम्हाला वारंवार मशीन चालू बंद करावी लागत असेल तर 4 स्ट्रोक इंजिन सुरु करणे शारीरिक दृष्ट्या सोपे ठरते.
२. माझा वापर रहिवासी भागात आहे की रहिवासी भागापासून लांब ?
4 स्ट्रोक इंजिन चा आवाज हा 2 स्ट्रोक पेक्षा कमी असतो. त्यामुळे जर रहिवासी भागात किंवा ऑफिस च्या परिसरामध्ये तुमचे काम असेल तर 4 स्ट्रोक ग्रास कटर तुम्ही घेतला पाहिजे. त्याने इतरांना आपल्या कामाचा त्रास होणार नाही.
३. माझे काम जमिनीला लागून आहे की इतर दिशांमध्ये देखील वापरावे लागणार आहे?
2 स्ट्रोक ग्रास कटर हे ३६०o मध्ये वापरता येतात पण 4 स्ट्रोक मध्ये ऑइल वेगळे टाकावे लागत असल्यामुळे ३६०o वापरता येणे कठीण असते. मात्र होंडा कंपनी चे 4 स्ट्रोक ब्रश कटर त्यांचा आधुनिक लुब्रिकेशन टेक्नीक मुळे ३६०o वापरता येतात.
४. माझे बजेट किती आहे ?
उत्तम दर्जाच्या 4 स्ट्रोक आणि 2 स्ट्रोक ग्रास कटर ची तुलना केली तर 4 स्ट्रोक ब्रश कटर ची किंमत ही 2 स्ट्रोक पेक्षा जास्त असते. मात्र इंधन खपत प्रति तास ही 4 स्ट्रोक ची 2 स्ट्रोक पेक्षा कमी असते.
तर तुमच्यासाठी कोणता ब्रश कटर उपयोगी राहील हा निर्णय तुम्ही आता घेऊ शकाल. खाली काही 2 स्ट्रोक व 4 स्ट्रोक ब्रश कटर आहेत, त्यापैकी ब्रश कटर ची व्हिजी ॲप मध्ये सविस्तर माहिती घेऊन तुमच्या साठी निवडावा.